Type Here to Get Search Results !

मेट प्रीमियम लीग मध्ये बारा वर्षीय क्रिकेट खेळाडूचा झंझावात : विहान शिर्के च्या अष्टपैलू कामगिरीवर अभिनंदनाचा वर्षाव



वाडा/प्रतिनिधी : वाडा तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मेट गावात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी क्रिकेट प्रीमियम लीगचे आयोजन 25 आणि 26 जानेवारी रोजी करण्यात आले होते. ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गावातील सहा संघामधील ‘मेट सुपर किंग’ या संघाने उत्कृष्ट कामगीरी करत प्रथम पारितोषिक मिळवले. या दोन दिवसीय क्रिकेट लीग चा प्रमुख आकर्षण ठरला तो 12 वर्षीय विहान ज्ञानेश्वर शिर्के. त्याच्या अष्टपैलू कामगिरीने त्याने मेट सुपर किंग संघाला प्रथम स्थान मिळवून दिले. त्याने अनेक वैयक्तिक परितोषिकांवर आपले नाव कोरून, कोणत्याही वयात आपण आपले सर्वस्व दिल्याने यशस्वीता मिळतेच! असा आदर्श लहान वयात निर्माण केला आहे. यावेळी गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते मॅन ऑफ दि मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, रायजिंग स्टार आणि हजारो रुपयांचे रोख पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ आणि खेळाडूंकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments