कुर्मी महासभेचे राष्ट्रीय महाअधिवेशन व महिला महाअधिवेशन जबलपूर येथे होणार महाराष्ट्रातून 100 पदाधिकारी उपस्थित राहणार प्रतिनिधी/29 मार्च :अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय महाअधिवेशन व महिला महाअधिवेशन मध्यप्रदेशातील जबलपुर येथे 4 व 5 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. हे दोन दिवसीय महाअधीवेशन दाऊ मॅरेज गार्डन, महाराजपूर येथे होणार असून देशभरातून समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.या महाधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, केंद्रीयआरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. * महाअधिवेशनात कुर्मितील विविध समाजांचा सहभागया अधिवेशनात कुर्मिमधील पटेल, पाटील, पाटीदार, मराठा, कुनबी, कलबी, कुडुंबर, कूर्मि, देवेंद्र कुल वेल्लालर, महतो, गुर्जर, खंडायत, नायक, नायडू, कापू, चंद्राकार, अंजना समाज, कम्मा, ओक्का लिंगा, कुलमी आदी विविध समाजांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.या अधिवेशनात शेती व शेतकरी प्रश्न, युवा विकास, महिला सक्षमीकरण, उद्योग व रोजगार, समाजाची सर्व क्षेत्रांतील सहभाग वाढ अशा महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार असून विविध ठराव मंजूर करून समाजाची सर्व क्षेत्रांतील भागीदारी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.या महाअधिवेशनात कुर्मी महासभेचे राष्ट्रीय संरक्षक एल. पी. पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वी. एस. निरंजन, राष्ट्रीय महासचिव उमेश कुमार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा लताऋषी चंद्राकर, युवा अध्यक्ष धीरज पाटीदार तसेच उद्योग महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वर्मा मार्गदर्शन करणार आहेत.* महाराष्ट्रातील प्रतिनिधींची उपस्थितीदेशातील विविध राज्यांतील प्रांतीय पदाधिकारी आपल्या जिल्हाध्यक्षांसह सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, महासचिव जयेश शेलार पाटील, कोषाध्यक्ष संदीप काळे पाटील, युवा अध्यक्ष प्रमोद ठोंबे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा डॉ. शोभाताई गायकवाड, उद्योग महासभेचे प्रदेश अध्यक्ष समीर पाटील तसेच विद्यार्थी महासभेच्या प्रदेश अध्यक्षा कु. निकिता पाटील उपस्थित राहणार आहेत.याशिवाय, पुरोहित महासभेचे कोकण प्रांताध्यक्ष विजय दलवी, कृषी महासभेचे संभाजीनगर विभागाध्यक्ष तसेच राज्य शासनाचे कृषिभूषण भगवान रामजी इंगोले यांसह 100 पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.तर या अधिवेशनात महाराष्ट्र कुर्मी समाजाचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ. बाबूलाल सिंह यांच्या स्मरणार्थ समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. Gramin Maharashtra March 29, 2026
मेट प्रीमियम लीग मध्ये बारा वर्षीय क्रिकेट खेळाडूचा झंझावात : विहान शिर्के च्या अष्टपैलू कामगिरीवर अभिनंदनाचा वर्षाव Gramin Maharashtra January 27, 2026
किटकनाशकांची विनापरवानगी विक्री बेकायदेशीर तर फवारणी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) परवाना घेणे बंधनकारक Gramin Maharashtra January 11, 2026
कृत्रिम वाळू (एम-सॅण्ड) उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावे Gramin Maharashtra January 10, 2026
रान डुक्कर आडवे आल्याने कारचा भीषण अपघात ; निलेश वेखंडे यांचा दुर्दैवी मृत्यू Gramin Maharashtra January 10, 2026
Social Plugin