Type Here to Get Search Results !

रान डुक्कर आडवे आल्याने कारचा भीषण अपघात ; निलेश वेखंडे यांचा दुर्दैवी मृत्यू

 



वाडा: दि.10 जाने.: 

वाडा तालुक्यातील देसई - तिलसे या मार्गावर कार समोर अचानक रान डुक्कर आल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालक निलेश दत्तात्रेय वेखंडे (वय ४३) रा. सोनाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

ही घटना शुक्रवारी (दि.9 जानेवारी) रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली. निलेश हे सध्या वाडा येथे राहत असून तिलसे येथील आपले दुकान बंद करून ते वाड्याकडे येत असताना सोनशिव गावच्या अलीकडे हा अपघात घडला. या परिसरात बिबट्या, राम डुक्कर अशा वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असून निलेश यांच्या कार समोर अचानक रानडुक्कर आल्याने त्यांची कार रानडुक्कराला धडकली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. निलेश यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 दरम्यान सध्या ग्रामीण भागात बिबट्या, रानडुक्कर व अन्य वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असून बाईकस्वार, कार चालक व इतर वाहन चालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments