कोकण विभाग पत्रकार संघाकडून ठाणे व कल्याण शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय हांडोरे व कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार यांच्या हस्ते या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी खालीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कोर कमिटी अध्यक्ष जगदीश खंबाळे, उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सचिव सचिन बुटाला, नियोजन प्रमुख मच्छिंद्र कांबळे, ठाणे शहर जिल्हा
अध्यक्ष विजय यादव, सचिव शरद घुडे, उपाध्यक्ष प्रवीण आंब्रे यांसह अन्य नियुक्त करण्यात आल्या असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
तर कोकण विभाग पत्रकार संघाची संपूर्ण कोकणात रचना करण्यात येणार असून पत्रकार बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी संघ कार्यरत राहील, अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष संजय हंडोरे यांनी यावेळी बोलताना दिली.


Post a Comment
0 Comments